विदाई लेकीची...

Started by गणेश म. तायडे, December 12, 2016, 08:01:14 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

लहान होती तेव्हा
दुडूदुडू चालायची
थोडी मोठी झाल्यावर
गुलूगुलू बोलायची
कधी पप्पा कधी बाबा
म्हणून गालातच हसायची
खचलेल्या बापाला तु
नेहमीच धीर द्यायची
दिवस लोटत गेले
वर्षेही लगेच संपत गेली
पाहता पाहता छकुली माझी
कळलेच नाही कधी मोठी झाली
माझे कर्तव्य बापाचे मी
आज पुर्ण केले बेटा
विदाई तुला देताना
कर ना तो लहानगा टाटा
अगं नको रडू आता
आसवांना तुझ्या जपलं आहे
जाताना मागे नको वळू
बापाचा कंठ दाटून आला आहे
आनंदात रहा तु बेटा
सासरी सुखी तु नांद
एकदा तरी दिवसातून
या बापाची आठवण काढ

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11