गुरूच्या कविता...

Started by Balaji lakhane, December 13, 2016, 06:01:46 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

---------😂---गोडीत गोडी---😂--------

उठल्या उठल्या सकाळी मला
एक आनंदाची गोष्ट समजली.!
मित्राचा मेसेज आला मला अरे,
*गुरू* तुझी कविता चोरी गेली.!

चोरी गेल्यावर नाराज होऊन,
आता काहीच फायदा नव्हता.!
म्हणून मी आज चोरा वरच
कविता लिहायच ठरवल आता.!

ज्या  चोरानी माझी कविता,
चोरली त्याला मी मेसेज केलं.!
नमस्कार , शुभ सकाळ सरजी,
तुमची कविता आवडली म्हणलं.!

तो चोरही म्हणला मला सरजी
धन्यवाद तुमचं नाव तरी  काय.!
म्हणल तुमच्या येवढां मोठा नाही
नाव *बालाजी लखने(गुरू)* हाय.!

आता काय सांगू राव तुम्हाला,
नाव सांगताच दचकला होता.!
मी त्याला मेसेज करत होतो,
तो मात्र रिप्लायच देत नव्हता.!

मी म्हणल ओ सरजी बोला,
काही तरी कुठ हरपलात राव.!
तुम्ही काल रात्र ग्रुपवर टाकलेली,
रचना एकदम जबरदस्त होती राव.!

त्याने मला हसरा 😊हा इमोज
पाठवला आणि धन्यवाद म्हणाला.!
मी हात जोडल्याचा डोळा मारल्याचा
🙏😉हा इमोज त्याला पाठवला.!

मला पण तेवढच त्याच्या सोबत
रोज रोज मसकरी करत होतो.!
उठल्या बसल्या कविते बाबात
त्याच्याशी चर्चाच करत होतो.!

त्यालाही  माहिती होतं कविता,
चोरली  म्हणून तो अस करतोयं.!
मी मात्र तो पुन्हा चोरी करू ,
नये म्हणून त्याला बोलतोयं.!

काहीच पर्याय नव्हता त्याला,
काहीच बोलताही येत नव्हते.!
फक्त माझ्या चांगल्या बोलण्यातून,
कविता चोरू नको म्हणायचे होते.!

काही दिवसा नंतर तो लाजून,
*गुरू* सॉरी मी तुमची कविता चोरली.!
म्हणालो सर्वांना माहिती हि कविता,
अगोदरच महाराष्ट्र नावाने फिरली.!

---😂---बालाजी लखने(गुरू)---😂----
             उदगीर जिल्हा लातूर
             भ्र...८८८८५२७३०४