दिगंबरा ( श्री दत्त जयंती च्या समस्त रसिकांना हार्दिक शुभेच्छा... )

Started by गणेश म. तायडे, December 13, 2016, 02:55:33 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।
कृपा करा दयाघना
या जीवावर कृपा करा ॥

गुरु विना नाही
मोल या जीवाला ।
रूप लोचनी हे
माझ्या मना आवरा ॥

स्तब्ध व्हावे सारे
येता तुझ्या शरणा ।
वाट दावी दासा
तुझ्या लेकराला ॥

कर जोडूनी मी
उभा रामदासा ।
आशिष द्यावे मज
पाठीशी सदा राहा ॥

अहो दूर करा
अज्ञानी काळोखाला ।
ज्ञानाच्या तेजाचा
प्रसाद मज द्यावा ॥

दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।
कृपा करा दयाघना
या जीवावर कृपा करा ॥

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11