आतमध्ये होणारा जाळ*****

Started by suraj patil 1107, December 13, 2016, 08:19:46 PM

Previous topic - Next topic

suraj patil 1107

आतमध्ये होणारा जाळ नाही विझवता येत डोळ्याळून ओघळणाऱ्या अश्रूनेही,,,
तो जाळ पेटतच जातो,,,,, दिवसेंदिवस वाढतच जातो,,,,,
हृदयाला भेदून बाहेर येईल की काय असे उगीच वाटत राहते,,,,,

कातरवेळी उर असाच भरुन येतो,,,,,
तुझ्या दुराव्यावर विरह कवितांचा भडिमार करुन काहीच उपयोग नाही हे माहीत असताना ही,,,,,
आत उठते एक तीव्र सणक हृदयातून मेंदूपर्यंत अखंड भेदून जाते माझ्या शरीरासह अंतर्मनात,,,,,

हा एकांत खायला उठतो मला,,,,, तुझ्यात गुंतलेला मी, तसाच टिकून राहतो तुझ्यात,,, माझ्यासह,,,,,
कितीक क्षण येतील अन जातील,,,, मी मात्र तसाच राहील आहे तोपर्यंत कालातीत,,,,,
तुला असतील काही बंधने,,,,, मी असाच बेबंध, निर्विकार, निरभ्र, निष्क्रिय, निर्विचार, नित्य,,,,

या आगीतून उठणारा धूर पेरत जातो माझी अंधुक झालेली स्वप्ने आणि मनाला रोजच सांगत राहतो,,,,,
माझा त्या विश्वनियंत्यावर असणाऱ्या विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न नियती करतेय हल्ली,,,,,

मी या विश्वासावर घेतोय अजून श्वास,,,,, त्या विश्वनियंत्याच्या दरबारातच होईल काही माझा न्याय,,,
आणि नाहीच झाला तर एकवेळा माझे उदाहरण देऊन त्या विधात्याला दाखवील त्याच्या न्यायालयाचा हा न्याय,,,,

आणि घेईल हसत - हसत या जगाचा निरोप,,, पुन्हा कधीच जन्माला न येण्यासाठी,,,,,
तेव्हा मात्र आतला अग्नी विझलेला असेल कायमचा,,,,अगदीच कायमचा,,,,,
© सुरज पाटील
surajpatil1107@gmail.com