कामदेव होवुन जा ....

Started by Kumar Sanjay, December 14, 2016, 11:50:54 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

राञीत या हरवून जा
रंगात या विरघळून जा
माझ्या शुक्राच्या चांदण्याचे
अवकाश तु होवून जा

तुझ्या कस्तुरीचे गंध हे
माझ्या स्पर्शाला सांगून जा
माझ्या मधु अधराना
अधराची नवभाषा देवून जा

केशपाशातल्या वेणीत माझ्या
एक प्राजक्त तु खोचून जा
माझ्या निशिगंध पापण्यात तु
एक गुलाबी काजळखुण देवून जा

मी एक संमोहनी रति
तु कामदेव होवून जा !!!

कुमार संजय ...
7709826774