कोणीतरी असं असावं

Started by Vaishnavi Adkhale, December 14, 2016, 07:16:23 PM

Previous topic - Next topic

Vaishnavi Adkhale

कोणीतरी  असं  असावं , गालातल्या गालात हसणारं ...
भरलेच जर डोळे कधी , तर ओल्या आसवांना पुसणारं ...

कोणीतरी  असं  असावं , पैलतिरी साद घालणारं ...
शब्दांना कानात साठवून , गोड प्रतिसाद देणारं ...

कोणीतरी  असं  असावं , चांदण्यांच्या बारोबर नेणारं ...
अंधाररेल्या वाटेत , आपल्या बरोबर येणारं ...

कोणीतरी  असं  असावं , फुलपाखरापेक्षा सुरेख फुलणारं ...
फुलल्या फुलल्या सुगंध दरवळणारं ...

खरंच ; कोणीतरी  असं  असावं , कायम आपल्या मनात रमणारं ...

[ unknown Artist ]