माझ्यात काय अाहे ???

Started by Kumar Sanjay, December 14, 2016, 09:56:10 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

 सोडून गेली सहज बाकी काय आहे
तु नाही, त्या स्पष्टीकरणात काय आहे ?

निसटूनी गेले बंध नात्याचे
उरले माझ्या हातात काय आहे ?

गातो विरहाचे सुर कितीदा
वाटते पुन्हा, माझ्या सुरात काय आहे ?

मनातले अोठांत अाले , कितीदा रेगांळले
कवटाळले त्या मुक्या शब्दात काय आहे ?

अाले कितीदा मधुर अधरांचे निमंत्रण
तु नाही, त्या मधुर निमंत्रणात काय आहे ?

हरवुनी कितीदा माझेच मला ...
जिंकण्यात माझ्यात काय आहे ?

कुमार संजय
7709826774