प्रेमाला नजर लागून गेली....

Started by mahesh jadhav, December 15, 2016, 09:38:12 PM

Previous topic - Next topic

mahesh jadhav

   नजर लागून गेली
प्रेमाची तयारी मी पण केली
पण त्याला सुद्धा कोणाची
नजर लागून गेली.
वर्ष माझं पाहिलं ते
त्यात वय होत वीस,
मजा मस्ती, थोड खेळायचं
थोडं अभ्यास करायचं,
पण जेव्हा बघितल तुला......
ठरवलं...तुझ्या संगेच जगायचं.
मंग मी कॉलेजला   
थोडा लवकर जायचो,
तुला पाहण्यासाठी सदा
गॅलरीत असायचो.
कॉलेज भरण्याआधी
वेळ तुझी यायची,
मित्र मला म्हणायचे
अरे तुला नाही पटायची.
मी म्हणायचो त्यांना
माझी निवड खास आहे,
तुझ्या शिवाय जीव माझा
आता उदास आहे.
तुला नाही वाटलं कधी
माझ्यासंगे बोलावं?
आपल्याकडे का बघतो
जरा विचारून तर यावं?
नाही....हे तर मुलाचं काम
त्यात तुमचा EGO असतो,
अग..एकदा तरी बोलायचंस
थोडा सुधारलो असतो....!
नको प्रेम करूस पण
तिरस्कारही नको करू,
नको तू या जीवाला 
नजरेन असं मारू.
शेवटी तुझ्याशी बोलण्याची
वेळ जेव्हा आली
तयारी मी पण बसं...
एवढीशीच केली... 
''प्रेमाची तयारी मी पण केली
पण त्याला सुद्धा कोणाची
नजर लागून गेली''


:-महेश भा.जाधव नगरसूल
     ९५४५०९४९४६