कविता II ते दिवस त्या आठवणी परत काढायच्या नाही II

Started by siddheshwar vilas patankar, December 16, 2016, 02:38:39 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


पहिलं जेव्हा शिव शिव करायचो

तरी तुझा चेहरा समोर उभा राहायचा

त्या काळ्याभोर  बटांमधून पडणारा तुझा नेत्रकटाक्ष

मला रोम रोमांचित करायचा

तो पूर्ण प्रहर तुझ्या नेत्रप्रहारातच जायचा

फुलं व्हायचो शिवाला कि तुला

हे तोच जाणे

मी मात्र रमायचो

निरंजन तेवून फक्त काजळी राहायची

पूजाथाळी माझ्या बंद डोळ्यांकडे

जणू टक लावून बघत बसायची   

ते दिवस त्या आठवणी परत काढायच्या नाही

मला आता भूतकाळात रमायचं नाही

कळीचं फुल होतं

काही वाहतात देवाला

काही जातात सुकून

माझं प्रेमफुल वाहिलं मी कधीच तुला

निर्णयाची वाट बघून बघून

मी गेलोय पुरता थकून


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C