कधी काळी ...

Started by Kumar Sanjay, December 16, 2016, 07:17:15 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

कधी काळी ज्या गीताची
अावड होती तुझ्या मनाला
आता का? अडखळतात
अधर तुझे गाताना

कधी प्रेमपञ लिहायची
सवड होती तुझ्या शब्दाना
आता का? थांबतात
हात तुझे लिहताना

कधी काळी ज्या स्वप्नानाची
निवड होती तुझ्या नयनांना
आता स्वप्न विरघळतात
नयन तुझे बघताना ...

कुमार संजय
7709826774