कविता II जोर काढुनी पोर काढलं , काट्यावरचं बोर निघालं II

Started by siddheshwar vilas patankar, December 17, 2016, 05:11:59 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


जोर काढुनी पोर काढलं

काट्यावरचं बोर निघालं

ऐन उमेदीत रंग दाखवलं

कार्ट सालं क्रूर निघालं

नाना स्वप्नं पाळण्यातली

अश्रूं बनली पापण्यातली

स्मरती कर्मे मागली पुढली

काठी साली कमकुवत निघाली

मी पण देखील हेच केले

उगाच वाही अश्रुंचे नाले

का दोष त्या नशिबाला ?

पुसलेस का कधी आईबापाला ?

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C