गरूच्या कविता...

Started by Balaji lakhane, December 17, 2016, 05:13:10 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

-------मिरच्यांची चटणी लय गोड--------

आठवत का गं तुला,
मी शेतात सकाळी सकाळी,
भल्या पाहटे निघून जायचो,
तू मग डोक्यावर उण,
आल तवा जायचीस....
डोक्यावर चटणी
भाकर घेवून...
शिवारात एका झाडाच्या,
खाली बसून खायचो,
तू मिरच्यांची चटणीच,
आणायचीस...
मला तिखट आवडत
नाही तरी पण...
मी चटणी खायचो,
मला तिखट लागायच,
तू मात्र एक साखरे सारखी,
गोड गोड चिटूक पप्पी देत द्यायचीस....
मग मला आजून मिरच्या ची
चटणी खाऊ वाटत असत....
आठवत ना... पिल्लू...

---------बालाजी लखने(गुरू)---------