कळेना ....

Started by Kumar Sanjay, December 18, 2016, 10:43:18 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

विसरावे कसे तुला कळेना
नव्याने कसे जगावे कळेना

डोळ्यांतील डोहाना वाट फुटेना
ओठांतील शब्दांचे मोैन सुटेना

कधी अडखलणारा रस्ता संपेना
पायातील बोचणारी काटे निघेना

पुन्हा विसरावे तुला नव्याने
कधी न स्मरायच्या निर्धाराने

कुमार संजय
7709826774