अखेरच्या वळणावर.... ( तीन )........

Started by Ashok_rokade24, December 18, 2016, 10:50:02 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

वळणावर अखेरच्या ,
वळून मागे पहातांना ,
पूर आसवांचा वाहतो ,
आठवणी आठवतांना ॥

दिस शाळेचे ऊठणे जीवावर ,
सव॔गड्या सह खेळण्या तत्पर ,
न कळे काही भले चांगले ,
मित्रांशी मैत्रीचे नाते जुळले
विसर पडे सुखदुःखाचा ,
मित्रा सवे नित रमतांना ॥

वर्ग वाढले वय ही वाढले ,
नाते मैत्रीचे कधी न विसरले ,
सुखदुःखात धाऊन आले ,
मित्रा साठी मित्र नित झटले ,
जात धर्म भेद न ऊरला काही ,
क्षण सुखदुःखाचे भोगतांना ॥

काळ सुवर्ण आता संपला ,
कर्तव्यात जो तो अडकला ,
परि बालपणीचे सारे सोबती ,
साथ सुखदुःखी अजून देती ,
एक एक सवंगडी आठवे ,
मिटल्या नयनी पहातांना ॥

पूर आसवांचा वहातो ,
आठवणी आठवतांना ॥

                 अशोक मु .रोकडे.
                   मुंबई,