***** तू गेल्यापासून *****

Started by Shri_Mech, December 18, 2016, 06:38:14 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

***** तू गेल्यापासून *****


माझ्या प्रेमाला नाकारून
तू रागात निघून गेलीस
पण जाता जाता तुझा अंश
माझ्यात सोडून गेलीस


तुझ्या जाण्याच्या दुःखातून
उभारलो असतो कसातरी
पण तुझ्या अबोल्याचा त्रास
टोचत राहतो कुठेतरी


प्रेम तर खूप केलं तुझ्यावर
पण ते ही कमजोर आहे गं
तू दिलेल्या आठवणींचं ओझं
त्याला आता पेलवत नाही गं


मग बसतो जाऊन अशा जागी
जिथे अश्रू लपवता येतात
कधी थोपवतो त्यांना आतल्या आत
तर कधी वाहू देतो त्यांचे पाट


तू असं करायला नको होतं
असं वारंवार वाटत राहायचं
पण तुझ्यावरचं प्रेमच
मनाची समजूत काढायचं

Shri_Mech
Shri_Mech