लोकल

Started by sawan kamble, December 18, 2016, 11:40:41 PM

Previous topic - Next topic

sawan kamble

लोकल म्हणजे काय लोकल
कुणासाठी फैशनचे फोकल
कुणासाठी कलेच व्यासपीठ                 
कुणासाठी व्यापाराची बाजारपेठ
         
कुठे विषय सुरु होतो कुठे संपतो
आपल स्टेशन आले हे कळतही नाही
एव्हना अबोल असलेली बोलकी होतात
दिलखुलास आपल मन मोकळ करतात

गर्दीत चढ़ताना लागला जरी कुणा धक्का
लाखोली वहिलीच समजा साधुन मोक्का
कुणाची भाषा शिवराळ तर कुणाची मवाळ
लोकल असली तरी भल्याभल्याना पड़ते भुरळ

शब्द :सावनकुमार