जेष्ठ नागरिक

Started by Asu@16, December 20, 2016, 02:04:35 PM

Previous topic - Next topic

Asu@16

   जेष्ठ नागरिक

जेष्ठ आम्ही नागरिक आम्हा
तरुणांकडून भीक नको
कृतज्ञतेचे भान नसेल तर
तुमचे फुकट दान नको
        वेळ नसेल तुम्हाला जर
        मनीचे दुःख सांगणार नाही
        आयुष्याच्या संकटांपुढे
        चार पायांवर रांगणार नाही
टाकाऊतून टिकावू म्हणून
पाळणाघर आमचे करू नका
अडगळीचा कचरा म्हणून
घर आमचे हरू नका
        जगण्याचा हक्क आमचा
        नाही कुणाच्या बापाचा
        नका देऊ दंश आम्हा
        दूध पाजल्या सापाचा
जेष्ठांचा मान ठेवण्या
कर्तव्याचे भान ठेवा
आशीर्वादाचे बळ मोठे
एव्हढे तरी ध्यान ठेवा
        जेष्ठ सागर ज्ञानाचा
        त्यात पोहण्या उपयोग करा
        आयुष्याचा मिळेल किनारा
        अन् जगण्याचा अर्थ खरा
भूतअंगणी वर्तमान खेळे
भविष्याचा खेळ नवा
आनंदाने जगण्यासाठी
तुमचा आमचा मेळ हवा
        आज जीवनी श्रेष्ठ तुम्ही
        जेष्ठ होणार फसू नका
        आज आम्ही जात्यात म्हणून
        सुपात तुम्ही हसू नका.

- अरुण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita