***** तुझा विरह संपवताना *****

Started by Shri_Mech, December 21, 2016, 11:17:17 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

***** तुझा विरह संपवताना *****


संपत नाही दिवस कुठलाच
आजही तुझ्याशिवाय,
थांबत नाही कुठेच मी
तुझ्या आठवणींशिवाय,


तू असताना होते
तुझे रुसवेफुगवे
आज तू सोबत नसताना
भासतात सर्वत्र चकवे


अलीकडे तर मला
शब्दही सुचत नाहीत
नाहीतर तू असताना कसे
वाहायचे त्यांचे झरे


तुझ्या नसण्याचा निर्वात
भरवतो मनाचा अवकाश
लागते अशी विचारांची तंद्री
त्यात सारतात कित्येक रात्री


झाले सगळे निःशब्द आता
निमाल्या सर्व ज्योती आशेच्या
मणभर विरह संपवताना
कणभर उरलो मी आता


Shri_Mech
Shri_Mech

RAM NAKHATE