सांग पोरा सांग...

Started by गणेश म. तायडे, December 22, 2016, 01:35:15 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

माझ्या लेकाची वाट
पाहत आहे दिस रात
सोडूनी गेला कसा
मला तो आश्रमात
कशी जाणवत नाही
त्याला मायची कदर
विसरून गेला सारं
झटकून मायचा पदर
ओझे झाले होते माझे
कि तुला नको होती माय
सांग पोरा सांग असा
गुन्हा केला तरी काय?
तुझ्या सुखासाठी सदा
केली मी धावपळ
आज माझ्या आसवांना
कळत नाही वेळ
जीव जाळला वाहला
तुला मोठं पाहण्यात
लाज वाटते तुला आता
मज आई बोलण्यात
असे काय केले पाप
देवाघरी गेला तुझा बाप
आशेवर आहे मी तुझ्या
घ्यायला कधी येतो माझा बाप...

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11