सांभाळ साधना

Started by विक्रांत, December 22, 2016, 11:21:49 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



पिकवितो आता बरड जमीन
देहा कष्टवून यथाशक्ती  ||
उदार वरूण गुरुचे वचन
मनी आठवून पुन:पुन्हा ||
तोच तू आहे निरखून पाहे
स्वानंदाचे लाहे वरदान ||
कधी अंकुरेल आता निरखणे
होईल फुटणे जाणपणे ||
फोफावेल पिक कृपेने सघन
सरेल तहान जीवनाची ||
तुझा कुळवाडी  दत्ता दयाघना
सांभाळ साधना कुंपणात ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/