नाटकी वैराग्य ...

Started by विक्रांत, December 22, 2016, 11:27:42 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


म्हणे मी वाहीला
जन्म हा दत्ताला   
परंतु गाठीला
पुरचुंडी ||१||
दिसतेय माया
वस्तूचा तो लोभ
येईनात कोंब
विरक्तीला ||२||
करतो जतन
कारणा वाचून 
वाहतेय मन
चिंता वाया ||३||
हे तो वरवर
नाटकी वैराग्य
साधने अयोग्य
असे देवा||४||
करी कळवळा
उपट समूळ
आशेची ही वेल
मनीची या ||५||
मिळो तळवटी
भक्तीच्या मोहरा
वृतीचा निचरा
होवो साऱ्या ||६||
अशक्य ते काय
तुजला दयाळा
साऱ्या जगताला
चालविशी ||७||
व्हावा तदाकार
वृतीने विक्रांत
दत्त स्वरुपात
सर्वथैव ||८||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in