सर्व दुर्गुणांचे | मूळ

Started by विक्रांत, December 22, 2016, 11:29:14 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


सर्व दुर्गुणांचे |
मूळ अहंकार ।
घाव तयावर ।
आधी व्हावा ।१।

राजा जिंकताच |
प्रजा हो लाचार।
शरण साचार |
येत असे।।२।।

आखलेला मार्ग |
येतसे दिसून।
पाहतो शोधून |
विरळाच।३।।

विक्रांता सज्ज
असे रणनीती ।
तलवार हाती |
उचलेना।।४ ।।

म्हणे अवधूता |
करी निर्दालन।
सर्वस्व वाहून।
दारी तुझ्या।।५ ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in