दत्तसागर

Started by विक्रांत, December 22, 2016, 11:35:58 PM

Previous topic - Next topic

विक्रांत




देहाची सरिता
दत्ताच्या सागरा
येवून माघारा
जावी नाच  ||

आले गेले किती
आहाळ वोहाळ
करून गढूळ
जीवन हे ||

कितीएक आले 
झरे इवलाले
देवूनिया गेले
सुख काही  ||

विरले आठव
भेटलेली गाव
अपाराचा ठाव
खुणावतो ||

माझे मीपण हे
संपून जावून
तयात विरून
मी "ठ" व्हावे  ||

विक्रांत वाहतो
दत्ताला स्मरतो
कल्लोळ करतो
अवधूता ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/