चंद्र सूर्य तारे

Started by विक्रांत, December 22, 2016, 11:43:28 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



चंद्र सूर्य अन हे तारे सारे
सखे सोबती माझे प्यारे  ||
सूर्य मजसाठी लवकर उठतो
जग सारे सजवून ठेवतो
कधी सोनेरी कधी तांबडे
मेघांना किती रंग ते देतो ||
आणि रात्री मी घाबरता 
चंद्र हसतो मज धीर देतो
शुभ्र प्रकाशी वाट दावतो
चांदण गाणे सोबत गातो ||
लुकलुक तारे आभाळ भरती
नक्षी किती वर नभात करती
मृदू रेशमी मज नीज आणती
स्वप्नदेशी सवे घेवून जाती ||