दुर कोठे स्मशानात

Started by kishor thite, December 23, 2016, 01:12:17 AM

Previous topic - Next topic

kishor thite

दुर कोठे स्मशानात
एकटाच मी जळीत होतो!
रडून गेले आपुले पराये
एकटाच अश्रु मी ढाळीत होतो!!

आता वाटलं खुप दुनियादारी झाली
तिरडीवर लोकांनी खूप गोडवे गाईली
मग जीतेपणी का सर्वांना पोळीत होतो!!दुर कोठे स्मशानात
एकटाच मी जळीत होतो!

मला दुःख नव्हते माझ्या जळण्याचे
कुणाला काही कळण्या न कळण्याचे
मीच तर मझला कसा छळीत होतो !
दुर कोठे स्मशानात
एकटाच मी जळीत होतो!

आपले म्हणणारयांनी बरबाद केलें
होते!
त्यांनीच तर खांदा देऊन स्मशानात नेले होते!!
अविश्वासाचा वार माझ्या कपाळीचं होते!!
दुर कोठे स्मशानात
एकटाच मी जळीत होतो!
पृथ्वीवरली माणसाची हो रे घाणेरडी जात!
आय़ुष्यभर लबाडखोरी अन
मरताना खाली हात!!
हसलो मग आयुष्यावर,,,
तेच तेच पुन्हा घोळीत होतो!!
परमेश्वरा तू मुक्ती दे....माणुसकीचा धंदा नको आता थेट देवाशी बोलीतं होतो!!!!
दुर कोठे स्मशानात
एकटाच मी जळीत होतो!