तुला सोडण्याचा विचार

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 23, 2016, 07:02:51 AM

Previous topic - Next topic
तुला सोडण्याचा विचार
मनी माझ्या आला होता
पण काय करू तुझ्या
प्रेमाचा काटा हृदयात
माझ्या आज ही टोचत होता
..........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर

swapnil dhote

प्रिय ,


आज कालच्या या जगात कुणी प्रेमपत्र लिहिते कि नाही ते माहित नाही पण मला वाटल कि माझ्या मनातल्या भावना मी शब्दांनी जास्त चांगल्या मांडू शकेन . मी यापूर्वी कधीच पत्र लिहिलेले नाही. आपल्या या जगात मुळी पत्र लिहण्याची आपल्याला कधी गरज नाही पडत . पत्रच कधी लिहिले नाही तर प्रेम पत्र तर खूप दूरचे झाले . चुका काही होतील या पत्रात तर हसून घे मन भरून पण भावनांना समजून घे आणि तुझा निर्णय कळव. पत्राने नको कळवू भेटल्यावर सांगशील .

गेल्या सात वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतो. आपल्यात चांगली मैत्री आहे. कळत नकळत दररोज एकमेकांना आपण भेटतो ,नेहमी एकमेकांच्या संपर्कात हि असतो. मला वाटत कि तू मला समजून घेतेस म्हणून इतक साहस मी करतो आहे कदाचित हे पत्र वाचताना तुला आता पर्यंत कळलेच असेल कि मला काय म्हणायचे आहे ते . मला तू आवडते आणि मला तुझ्या बरोबर संसार करायला खूप आवडेल कारण आपण जसे आहोत तसेच एकमेकांना आवडतो मला वाटत कि आयुष्यात खूप सारया गोष्टी असतात त्यात एकमेकांना समजून घेण खूप महत्वाचे असत , मला नेहमी वाटत कि खरच आपण एकमेकांसाठीच बनलो आहेत असे. तुला पण कदाचित तसेच वाटत असेल .. तसे नसेल वाटत तरी काही हरकत नाही पण एकदा विचार करून सांग ना ,  माझ्याशी लग्न करशील का ? लगेचच  नाही. अजून मी शिकतोय ना ? मला नोकरी लागल्यानंतर आपण लग्न करूयात. तुला हे सारे वाचून जरा विचित्र वाटेल परंतु प्लीज मला समजून घे.
तुझा नकार असेल तर तो मी आनंदाने पचवून घेयील , पण तुझा अबोला, तो नाही माझ्याच्यानं सहन होणार........
तुझ्या उत्तराची वाट पाहतोय.............मला फोन करून कळव
तुझाच,