मन कधी कधी पुन्हा तुझ्या प्रेमात हरवून जात

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 24, 2016, 07:43:14 AM

Previous topic - Next topic
मन कधी कधी पुन्हा तुझ्या प्रेमात हरवून जात
पुन्हा मला तिथंच घेऊन जात जिथं
तू माझा हात धरला होतास
आज पुन्हा कधी कधी त्या बाका वर
जाऊन बसतो जिथून फक्त तुलाच पहायचो
आज हि हे मन तिथं गेल्यावर तुझ्या
आठवणीत रडू लागत पुन्हा पुन्हा
तुझ्याशीच बोलु लागत अग तू फक्त
माझीच ना मग का मला एकटं केलंस
हे मन पण असं आहे ना तू त्याला
सोडणार होतीस हे तरी कुठं त्याला
माहित होत बिचारं आंधळं प्रेम करत
होत तुझ्या वर
त्या बाका वर आज ही तुझं नाव
कोरलेलं पाहून अलगत अश्रूंच्या
धारा वाहू लागतात आणि अलगत
हे मन मला पुन्हा तुझ्या प्रेमाच्या
दुनियेत घेऊन जात आणि बोलतं
तू आज ही तिच्याच प्रेमात आहेस
तिनं हात धरला होता खरा पण
सोडताना तुझा विचार कधी केला
नाही तिनं ......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर

Krishna khandagale

एका हाताने स्वतःचा ड्रेस सावरत ,
चेहऱ्यावर आलेले केस कानामागे टाकत ,
घाईघाईने स्मितहास्य करून , समोर निघुन जात
पार मनाला वेड लावणारी तु .........
बकावर बसून गप्पा करत असताना,
बोलता-बोलता खळ्खळुन मनमोकळेपणाने हसत ,
आणि हसता-हसता बोलताना मधेच थांबत,
लाजून शांत होणारी तु ........
चष्म्याच्या आतील सुंदर काळे डोळे मिचकावत ,
बोलताना नजर चुकवून खाली बघत,
पायाच्या अंगठ्याशी खेळत,
शांतपणे एकणारी ,
हवी-हवीशी वाटणारी तु ........
कधी कधी बाकावर डोक ठेउन,
काहीच न बोलता ,
भिंतीकडे बघत,
गप्प गप्प राहत,
मनाला खूप त्रास देणारी तु ....
चालताना एकाच खांद्यावर ,
एका हाताने बॅग धरून,
खाली बघत बघत,
हळू हळू एक एक पाऊल पुढे टाकत,
विचार करत,
नजर चुकवून
डोळ्यांनीच खूप काही सांगणारी तु ..........
माझ असणं,
माझ हसणं,
माझ प्रेम ,
माझ सर्वस्व,
मी म्हणजेच तु ............
आणि,
या प्रेमाच्या खोट्या, फसव्या, जगात
हरवलेला , अदृष्य,
तुझ्यावर वेड्यासारखा प्रेम करणारा ,
कुठेतरी मी............
क्रिष्णा खंडागळे ...