bhakti kavita

Started by avinashjee, December 25, 2016, 11:11:07 AM

Previous topic - Next topic

avinashjee

 लाडक्या गणपतीचे स्वागत

विघ्न-विनाशक सिद्धी-विनायक, आले रे गणपती
मनो-भावे पूजा करूया, दश-दिवसा साठी .

मूषक-स्वारी करून येते, विदयेचे दैवत
एकवीस मोदक अर्पुनी, होई तिचे स्वागत
दुर्वा वाहून नत-मस्तक होवू, पुष्पांजली सोबत

विद्येला जर असेल, विनयाची सोबत
गुरुजनाचे आशीष मग दावतील करामत
धन-धान्याच्या राशीचे मग ठाकतील पर्वत.

विघ्न-विनाशक सिद्धी-विनायक, आले रे गणपती
मनो-भावे पूजा करूया, दश-दिवसा साठी .