गुरूच्या कविता.

Started by Balaji lakhane, December 26, 2016, 06:48:46 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

----------------माझं मन------------------

तुला कधी कळलच नाही माझं मन,
तरी आस लावतोय प्रिये माझं मन.!

समोरून जातेस पण तू न बोलताच,
मनातच मोठ्याने रडतोय माझं मन.!

तू कधीच माझ विचार करत नाहीस,
तरी तुझंच विचार करतोय माझं मन.!

सखे तू म्हणतेस तूज प्रेम काही नाही,
टर- टर फाटतया बघं पोरी माझं मन.!

माझ्या कोमल मनात तू येऊन रहा,
तेव्हा तुला समजेल पिल्लू माझं मन.!

आठवण येताच डोळ्या समोर येतेस,
अलगद तुझ्यात वाहतोय माझं मन.!

तुझं आवाज माझ्या कानी पडताच,
कावर बावर होतोय  सये माझं मन.!

----------बालाजी लखने(गुरू)----------
            उदगीर जिल्हा लातूर
            भ्र...८८८८५२७३०४
E-mail- balajiguru8888@gmail.com