चांदोबा

Started by avinashjee, December 26, 2016, 10:10:45 PM

Previous topic - Next topic

avinashjee

 चांदोबा

आजोबांच्या कडेवर बसून, चांदोबाशी झाली दोस्ती
गट्टी जमली आमची,  बघता-बघता नुस्ति

इतका दूर राहुन,  मलाच आधी  दिसतो
मग मी चांदोबा, सर्वांना  दाखवतो

सुट्टी संपली आता, अन पोचलो नव्या घरात
दिसेल कारे चांदोबा, आता आजोबांशिवाय !

सात-समुद्रा पलिकडे, आजोबांचे घर
कोण दावील मजला आता, चांदोबा वर  !

झाली आठवण आजोबांची म्हणून गेलो अंगणात
हसत होता चांदोबा, माझ्या नवीन घरात

कसा आला इतक्या दूर, मला शोधत शोधत !
हळूच म्हणतो काय,  "नाही मला करमत" !