चक्रव्यूह

Started by sanjweli, December 27, 2016, 05:05:15 PM

Previous topic - Next topic

sanjweli

दि. 19/12/16

मौनात आहे मी नाही कुणावरती
डुख धरलेला कित्तेक तपांचा
निद्रीस्त ज्वालामुखी मी
दैवाच्या चक्रव्यूहात अडकलेला

तोच उन्मत त्सुनामी मी
समुद्र खवळलेला
क्रोधाची  माऊली
मीच अगस्ती तहानलेला

सारीपाटातील वजीर मी
मीच प्रत्येक डाव जिंकलेला
मी वीर मावळा तानाजी
गड आलेला पण सिंह गेलेला

वेळ काळ चराचरी मीच सर्व काही
मी जन्म-मृत्यु जीवाशी तरलेला
चिरंजीव चिरंतन संजीवन मी
देह फक्त सोडलेला
©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील