शनाया

Started by sanjweli, December 27, 2016, 05:34:32 PM

Previous topic - Next topic

sanjweli

सगळ्या बायकांच्या चष्म्याचा
नंबर आता बदललाय............
आज प्रत्येक बायको
स्वत:ला राधिका
समजतेय......!
अन् नव-याला गुरुनाथ ??????
सायं ८ च्या टाइमिंग मुळे
जेवनाची मारामार.........
अन् सकाळी ७:३० मुळे
नाष्ट्याची झालेली गैरसोय........
  सांगायची कुणाला ?
'माझ्या नव-याची बायको'
मधल्या गुरुनाथची
मजाय त्या शनाया बरोबर
पण आमच्या वर्तमानी
अस्थित्वात नसलेल्या
त्यांच्या मनी
अवतरलेल्या शनाया बद्दल
कसं समजावयचं........
ह्या जगदंबा मातेच्या अवतारांना?
ये देवा वाचवायला...........
©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील