संसार

Started by sanjweli, December 27, 2016, 06:26:18 PM

Previous topic - Next topic

sanjweli

२२ मे १९९८

आठवते का तुला साजनी,
स्वप्नातले ते आपले घर,
फुटले गं पंख त्यांना,
आपल्याला लोटले दुर,

नवमास गर्भात सांभाळुनी,
पडला गं त्याना विसर,
हातात राहु दे हात साजनी,
देऊ एकमेका आधार,

थकलेले हे जीव आता,
काया ही जर्जर,
विस्मरणाचा खोल भाता,
आठवणींचा ओसरेल पुर,

कसं विसरु रं साजना
अंगणातलं पहीलं पाऊल
घरधनी रांगडा उभा
ना पडे कशाची भुल

कष्टाचा पाठ पाढा सारा
सरुन जाई दिसं अवकाळ
स्पर्ष होई परिसाचा
पिकं सोनेरी डोंगरान माळ

  हात पसरले नाही
ना मागीतली भीक
कुणी म्हणे थोरांमोठ्यांचे आशीर्वाद
कुणी म्हणे आईवडलांची पुण्याई

जमीन जुमला काळी मायमाती
बंगला गाडी घोडा
लक्ष्मी थेट पाणी भरी
थाट दिमाखदार मोठा तोरा

पिवळे हात केले रंगली मेंदी
झाले दोनाचे चार
बनलो वरबाप वरमाई
फुलला संसार
जीव गुंतला नातवामंदी

दोघांची ताटातूट
नको  ससेहोलपट जीतेपणी
जीवनाचा जीवनपट
धडा शिकवी क्षणोक्षणी

लेकरा !!
होतो पुरता हिशेब
भोग चुकत नाही कुणाला
बालपण,तारुण्य परत
ना मिळतं रे कुणाला.

©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३