जादुगार

Started by sanjweli, December 27, 2016, 06:36:16 PM

Previous topic - Next topic

sanjweli

८/१२/१६

मी शब्दांचा जादुगार,
खेळतो शब्दांचा बाजार,
कधी सुखाचा कधी दुखाचा
फुलवीतो अंगार,

आर्त हाक आतुन येते,
रोज नव्याने फुलते कवीता,
शब्दसुमनांच्या महफिलीस होतो
हा शायर तैयार,

येते भरती ओहोटी सागराला,
पायधुळ तेंव्हा ललाटी लावतो,
कधी वपुंचा पार्टनर तर कधी,
गझल मस्त कलंदर सुरेशाची बनतो,

ना तुझ्या पायची आम्ही धुळही,
ना कोण तुझ्याशी तुलना करतो,
तूच नभीचा चंद्रमा,
तू ईश्वर शब्दसृष्टींचा,शब्दांचे भांडार.

©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३