कर्ण

Started by sanjweli, December 27, 2016, 08:01:49 PM

Previous topic - Next topic

sanjweli


कर्ण
मी कधी कुणाची
तमा बाळगली नाही,
मी कधी कुणाची
स्पर्धा केली नाही,
मी स्वछंदी,
मी मनस्वी ,
जीवनात हार कधी
मानली नाही,
वार करणारे पाठीवरती,
सामोरे कधीच आले नाही ,
निशस्रासी न लढणं
हा धर्म माझा,
तो कधीच मी
सोडला नाही,
ज्या मातेनं जन्म दिला,
तिच्या मायेला
जन्मतःच पारखा झालो,
तीने दिलेला शेवटचा
शब्द ही मोडला नाही,
मरणाची भीती
होती कुणाला,
हसत हसतच
कवच कुंडलं दान केली,
मैत्रीत कधीच दगलबाजी केली नाही
धर्म अधर्म सगळं काही कळत होतं,
पण मित्राची साथ
कधीच सोडली नाही,
मृत्युलाही जिंकू शकत होतो,
पण भगवंताशी कधीच
प्रतारणा केली नाही,
माझा धर्म मी कधीच सोडला नाही .
हीच माझी अोळख
जी कुणीच बनवली नाही ........

©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३