अश्वस्थ

Started by sanjweli, December 27, 2016, 08:17:56 PM

Previous topic - Next topic

sanjweli

अश्वस्थ
या पांढ-या कपाळी,
नाही भाग्याची रेष,
जळतात येथे,
भग्न स्वप्नांचे अवशेष,

दुःखाचे हलाहल पचवून
बनलो जरी निलकंठ मी !
माझ्या या दुनियादारीची का
कुणास फिकीर नाही ?"

भोगल्या मी किती यातना,
भोगले मी किती क्लेष,
पदोपदी अपमानाशिवाय,
नियतीचा मला दुसरा,
पुरस्कार नाही ?"

भाळी अश्वस्थाम्याची,
संजीवन जखम घेऊन,
मरणवाट शोधत फिरतो मी,
मुक्त झाले, आप्त,स्वकीय ,
जरी या जन्ममृत्युच्या फे-यातूनी
माझ्याच  शापास का दुसरा,
कोणता उःशाप नाही ?"

©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
sanjweli
९४२२९०९१४३