खंत बाबाची !

Started by Asu@16, December 27, 2016, 09:06:20 PM

Previous topic - Next topic

Asu@16

खंत बाबाची !

मनातील भावना
राहतात फक्त ऊरी
व्यक्त व्हायला वेळ नाही
खंत बाबाची खरी
धावपळीच्या जगण्यात ,
सय जरी काढलीस पोरी
आयुष्याच्या वाळवंटात ,
फुटतात पाण्याच्या झरी
फुटतात पाण्याच्या झरी

- अरुण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita