दैव

Started by sanjweli, December 27, 2016, 09:08:28 PM

Previous topic - Next topic

sanjweli


दैव
अशी कशी चाल तुझी,
उठली जीवावर ,
पाहता पाहता संपलं सारं,
सामोरी दाटला,
काळाकुट अंधार,
जन्म, मृत्यू, दैव,
सारा तुझाच रे खेळ,
असा कसा  रे घातला,
माझ्या जीवनी तू अवमेळ,

अशी कशी चाल तुझी
उठली जीवावर ,
संपल्या त्या आणाभाका,
संपल्या त्या गुजगोष्टी,
आता ना गाठभेठ कुणाची,
हा कसला रे अखेरचा निरोप,

अशी कशी चाल तुझी,
उठली जीवावर ,
तुटली ती रे बंधने सारी,
तुटले ते रे सारे मोहपाष,
भरला संसार उघड्या डोळ्यांनी पाहुनी
रित्या हाती कफल्लक एकटा चाललो,

अशी कशी चाल तुझी,
उठली जीवावर ,
सुख,दुख, भोग,सारे,
सगळे तुझेच रे फासे,
तुला ना रे तमा कुणाची,
पैलतीरी रे हेलकावे खाते
ती माझी एकल्याची नाव,

अशी कशी चाल तुझी,
उठली जीवावर ,
संपला रे भातुकलीचा खेळ,
तुटला  आता दोन जीवांचा मेळ,
केली तू रे माझी लेकरे पारखी,
आता फक्त त्यांना रे  तुझाच आधार.
©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३