साहीत्ययात्री

Started by sanjweli, December 28, 2016, 03:09:25 PM

Previous topic - Next topic

sanjweli

सुवर्णाक्षर

" तुला जे सुचल...
तू ते पानावरती उमटवं,
ते पान ही बोलू लागेल
मनातल्या इच्छा, आकांक्षा ,
पाहीलेली स्वप्न सत्यात उतरतील !

आकाशाला गवसणी घाल,
खुप दुरवरती जा ! ....
धृव स्थान काबीज कर,
माघारी फिरु, परतू नकोस
एवढं मात्र तू विसरु नकोस

लक्षात ठेव तू एक यात्री आहेस !
" खुप मोठा हो
मागे वळुन पाहु नकोस,
तुझा भुतकाळ केव्हाही
विसरु नकोस

तुझ्यातील कलेसाठी जग-मर,
प्राणपणाला लाव !
येणारे अडथळे अडचणी
सहच पार होतात,

त्या साठी तशी गरुडझेप घे !
समोर हिमालय जरी उभा
ठाकला तर त्यालाही ललकार,

म्हणुन इच्छाशक्ती
तेवढी दांडगी ठेव,
या जगात अशक्य
असं काही नसतं

येणारा प्रत्येक दिवस
कधीच अन् रात्र
कधीच सारखी नसते
दिवस पालटतील

एखादा दिवस तुझ्या
नावानं उगवेल !
तेँव्हा तुझ्या आयुष्यातली
ती सोनेरी सकाळ
कधीच विसरु नकोस,
क्षितिजाला पार कर
धृव्व  हो !!!!!

©- महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३