व्यवहार

Started by sanjweli, December 28, 2016, 08:05:53 PM

Previous topic - Next topic

sanjweli

 :angel:
२८/१२/२०१६

व्यवहार

कल्पनेच्या विश्वात रमणं,
सहज सोपं गणित आहे,
अन् व्यवहारी जगात जगणं,
तेवढचं अवघड प्रमेय आहे,

टिवल्या बावल्यांचा खेळ,
मीच पाहत आहे,
रोज नीत्य नवा दरबार,
कलीचं युग सुरु आहे

पक्ष,सत्ता, राजकारण ,
सारं काही थोतांड आहे,
गणिकेप्रमाणं याचंही नवीन
गि-हाईक कसं ठरलेलं आहे ?

रोज होतो बलात्कार लोकशाहीवर ,
जनता उघड्या डोळ्यानी पाहत आहे ,
शासनदरबारी सरकार वजाबाकी बेरीज
सत्ता समीकरणच का  बदलत आहे ?

पंचवार्षिक धुळ खात पडणं ,
कोनशीलेचा अल्पोपहार ठरलेला आहे ,
तेरी बी चुप और मेरी बी चुप,
हा नवीन सारीपाटाचा खेळ आला आहे ,

घोषणांचा होतो पाऊस ,
निवडणुक जवळ येत आहे ,
पुढारी गालातल्या गालात ,
मात्र स्मितहास्य का करत आहे ?

यांना कसं बनवलं ,
पुढारी छाती ठोकपणे सांगत आहे,
सत्तेचा कुणाला नसतो मोह,
विरोधी पक्षनेता का सांगत आहे?

संसदेत असतोच नेहमी सावळा गोंधळ,
निवडून येणारा प्रत्येक महाभागच सांगत आहे,
शेवटी जनता जनार्दनच असते सार्वभौम,
पुढा-यांच्या हाती मग कशी कळसुत्री आहे ?
   
राजरोस, दिवसाढवळ्या,रात्रंदीन चालू डांस बार,
नियमावली फक्त का मग आपल्यासाठीच आहे ?
बारबाला पण आहेत माणसं,
सरतेशेवटी त्यानाही पोट आहे,

सत्ता बदलते फक्त,
सगळा कारभार सारखाच आहे,
राजा जरी पुण्यवान,
दरबार सारा का पापी आहे ?
 
जगाचा आहे न्याय अजीब,
येथे चोर सोडुन सन्याश्याला फाशी आहे
साधी भोळी जनता आहे गरीब,
पाषानाचा देव पहा कसा श्रीमंत आहे ?

पैसाच प्रश्न, पैसाच उत्तर,
सगळा उठाठोप कश्यासाठी आहे ,
काळा पैसा, पांढरा पैसा का खरेच ,
या आधी कुणास कळला आहे ?

बेहिशोबी मालमत्ता,गैरव्यवहार,
सगळं बाहेर निघणार आहे,
सोन्याचा धुर खरंच का पुन्हा निघेन,
कँशलेस कारण सारंच होणार आहे.

©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील :angel:
९४२२९०९१४३