माझं भावविश्व

Started by sanjweli, December 28, 2016, 09:07:33 PM

Previous topic - Next topic

sanjweli


दि. १४ फेब्रुवारी १९९७.

तुझ्या नावाचं मी
विश्व तयार केलय,
तुझ्या आठवणींच,
मी घर बांधलय,
तुझ्या नजरेचे पंख,
फुटलेत मला,
तुझ्या केशसागराच्या,
मोरपंखी झालरीत,
एकदा निद्राधीन व्हायचंय मला ,
आता फक्त हवा आहे,
तो तुझ्या प्रीतीचा आसरा मला,
या आस-याच्या आधारांन संपुर्ण,
आयुष्य जगायचंय मला
फक्त तुझ्यासाठीच...... .....!
माझं हे वेडं भावविश्व
मी फक्त वाहीलंय तुला.
©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३