सैराट

Started by sanjweli, December 29, 2016, 07:27:38 AM

Previous topic - Next topic

sanjweli

सैराट
कंच वार भिनल
माह्या अंगामंदी,
शिरलं पिरतीच खूळ
माह्या डोक्यामंदी,
दिन रात सदा येडी
खूळी चाहूल तुही
काहीली काहीली
झाली म्हव्या मनाची,
वणवण झाली
किती किती माही
कंच वार भिनल अंगामंदी
रात सरना
येळ वैरीण झाली,
चंदाराणी कशी
रुसून गेली,
क्षितीज सारून आला शेवटी
कवडसा सोनसळी,
पहाट झाली गुलाबी,
कंच वार भिनल अंगामंदी,
नजरेचा वार नजरेवारी
आरपार ढाल लाजेची
लाजून चूर झाली,
आली कशी
सांग गालावर लाली
आस तुह्या भेटीची
अशी सैराट झाली.
© -महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३