माज

Started by sanjweli, December 29, 2016, 05:08:24 PM

Previous topic - Next topic

sanjweli

माज
1/12/2016

मी पणा, स्वत:ची खुमखुमी,
पैशाचा माज काही,
केल्या जात नाही,
काय मान,सन्मान
काय मान अपमान
म्हणे आमच्या शिवाय यांना
कोणी कुत्र विचारत नाही
काय इमानी जातीचीही
फिकीरही यांना नाही
मानसाच्या स्वभावाला
शेवटी औषध दुसरं नाही,
सुख असो वा दु:ख
यांचा ड्रेस कोड काही
केल्या बदलत नाही
शेंदुर फासलेला दगड
तो देव,
मानसातला देवही
कसा यांना दिसत नाही
देव दगडात पाही
याची काया रे निर्जीव
देव मानसात राही
करा रे आपली श्रद्धा सजीव
उभा हा बगळा
एका पायावरती
ढोंगी याचा भाव
वाटते कुणा कळत नाही
नियतीपुढेहीे कुणाची
चाल चालत नाही
पाप पुण्य,भोग,सारे
येथे कुणा क्षमा नाही
रक्ताची नाती जरी जारी
असतात त्यातही काही फसवी

©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील

९४२२९०९१४३