पुढारी

Started by sanjweli, December 29, 2016, 06:35:56 PM

Previous topic - Next topic

sanjweli

पुढारी
दि-24/11/16

माझ्या निर्णयानं का?
या राजकारण्यांचा,विरोधकांचा
बाजार उठतो
मी सत्तेत आल्यापासनं बघतोय!!!
कधी यांचा स्मृतीभंश,
तर कधी कपाळमोक्षही होतो,

पहा!!पहा!! कसे सैरावैरा
पळतात सारे
बघा आता !!!
म्हणतात ढोंगी कसे
सर्व सामान्यांना याचा त्रास होतो
सांगा यांच्या पिढीजात पैशाच्या गोदामांना
आता राहीला कोण वाली हो ????

विचारही येत असेल.....
कधी कधी त्यांच्या मनी
थंडीचा महीना चालू आहे
काळ्या पैशाची रग तर
आता पार ठार जळालीय
शेकुनतरी अंगामधी आणुया
थोडीशी उब हो!!

सांगा लोकहो!!
यांच्या बापजाद्यानीही नाही
कधी पाहीली रांग हो!!!
म्हणे 4000 बदलण्यास
जनतेच्या दु:खापायी रांगेत
उभा होतो,

बाष्कळ बोलघेवड्या गप्पा
सा-या यांच्या
जरी अनावधानाने कुणी
अपघातात मरतो
बोलतात कसे एकजात
सारे काळाबाजारी
नोटासाठी रांगेत सर्वसामान्य
नागरिकाचा नाहक बळी जातो

बघा जनता जनार्दन हो!!
तुम्हीच आता
आसपास कशी  जमली आहे
या पांढ-या बगळ्यांची रास हो
पैशासाठी बाप बदलणारे हे सारे
पहा तुम्हीच सगळे
कशी देतायत खांद्याला
खांदा लावून एकमेकांची साथ हो !!!!

रंग बदलणारे सारे
हे सरडे साले
कशी  मारतात खोट्या
दिमाखाची  मिजास हो !!
मफलर टोपी गुंडाळून
सभा काही ठोकता येत नाही
झाडू मारण्याची लायकी रे तुझी
ती ही तुझ्याच्याने काही सोडवत नाही

फोटो काढण्या इतके
राजकारण सोपे नाही
वंशपरंपरेने खुर्ची भेटली म्हणुन
कोणी राजा होत नाही

आपण यांना पाहीलत का?
ही ओळख तरी विरोधकांची
राहणार नाही  हो !!!
सलाम रे गड्या
तूला अन् तुझ्या सरकाराला
चांगली उतरवलीस संगळ्यांची
पैशाची झिंग हो!!!!!!
©- महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३