सदगुरू

Started by sanjweli, December 29, 2016, 06:43:29 PM

Previous topic - Next topic

sanjweli

सदगुरू

तुझे रूप ध्यानीमनी,
  चित्ती तुझाच रे ध्यास,
जगतारका सदगुरू गोदडनाथा
तार आम्हासी,
ऐक आर्त या लेकराची हाक,
पाठीराखा आमचाच तूच,
भार आमचा तुझ्या ठायी ठायी,

तुझे रूप ध्यानीमनी,
  चित्ती तुझाच रे ध्यास,
दोन्ही कर जोडोनी,
करतो विनवणी,
का रे बुडली
कृष्णाची द्वारका,
का रे झाली माझ्या
कर्णग्रामाची मथुरा,
घे आमची पापे सारी
पदरी तुझ्या रे पोटात,

तुझे रूप ध्यानीमनी,
  चित्ती तुझाच रे ध्यास,
होउ दे पुन्हा विठू लेकूरवाऴा
नांदू दे पुन्हा संताचा मेळा,
धर्म जाती पंथ ऐसा
दुजा भाव नाही
दे स्थान आम्हा
तूझ्या चरणी,
असे जगी दुसरे पुण्य
आम्हा कोणे नाही.
©- महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे
९४२२९०९१४३
कर्जत.