वेदना

Started by sanjweli, December 29, 2016, 06:55:34 PM

Previous topic - Next topic

sanjweli

कविता
२६ नोव्हे २०१६

वेदना सुखावली ह्रदयी
खोल अंतरी मनात,
दु:ख नांदते सुखाने,
ना परि कसला सायास,
हलाहल जीवनाचे लागे
अमृतापरि गोड,

मृत्युचाही वाटे मोह,
जगण्याची  येई घीन,
हा कसला आवेश,
ही कसली उभारी,
कडवट बोलण्याची,
लागे गोडी, अवीट,

शिस्त गुरुजनांची,
वाटे ना कमी कशाची
यश ना पेटवी नशा,
मस्तकी गर्वाची,
अपयश  सांभाळी,
देई उर्मी,जिद्द
उरी काहीतरी बनण्याची

माझ्या कवितेला
दु:खाची झालर असावी
कधी देवदासाची बखर
तर कधी भळभळणारी
अश्वस्थाम्याची संजीवन
जखम वाहावी

कर्णाची अभेद्य
कवच -कुंडलं तर कधी
पार्थाचं जीवन बदलवणारी
श्रीकृष्णाची गीता व्हावी
कधी संजयाची दुरदृष्टी बनावी.

गुरुदक्षिणेसाठी कापली
जाणारी एकलव्याचीअंगुली बनावी
माझी कविताही न मोडली जाणारी
भीष्मप्रतिद्न्या व्हावी
©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३