गुरू च्या कविता...

Started by Balaji lakhane, December 29, 2016, 07:01:56 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

---------आज काही बोलणार की नाही-------

सांग आज काही बोलणार की नाही,
मनातल गुपीत खोलणार की नाही.!

आज काल तू खुलून हसत नाहीस,
नयनात नयन मिळवणार की नाही.!

मला तू तुझ्या कुशीत घेऊन पिल्लू,
एक गोड चुंबण तरी देणार की नाही.!

प्रिये मी नाराज झाल्यावर रूसलास,
का म्हणून रुसवा काढणार की नाही.!

माझ्या समोर दुसऱ्या मुलींचे नाव घेऊन,
पिल्लू मला तू आता सतवणार की नाही.!

------------बालाजी लखने(गुरू)-------------
              उदगीर जिल्हा लातूर
              भ्र...८८८८५२७३०४