मैत्रीण...!

Started by Ravi Padekar, December 29, 2016, 08:53:09 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

माझ्या खास मैत्रिणीसाठी लिहिलेली एक कविता...(अपेक्षा)

बडबड तुझी सारखी
ऐकावीशी वाटते
छान दिसतेस म्हटल्यावर
अजून थोडी खेटते

माझ्या कुठल्याच गोष्टींवर
तुझा थोडाही विश्वास नसतो,
पण तुझं 'फेकू' म्हणून चिडवन
यात उगाच मी फसतो...

नाही नातं कुठलंच
फक्त तुझं माझं एकच गाव,
मैत्री साठी जवळ आले
दोघांचं 'पाडेकर' एकचं नाव...

माहित नाही कशी दिसतेस
कशी बोलतेस, कशी हसतेस,
पण तुझ्या दोन दिवसांच्या मॅसेजने
नेहमी तू मला आठवतेस...

तुझ्या माझ्या मैत्रीत
जरी आल्या दुराव्याच्या रेषा,
त्यातून एकदा का होईना आठवण काढशील
एवढीच ठेवतो मी अपेक्षा...!!!

कवि:- रवि पाडेकर.
मो.8454843034