●●◆घाव अंतरीचे तुला कधी कळले नाहीत◆●●

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 31, 2016, 06:58:46 AM

Previous topic - Next topic
●●◆घाव अंतरीचे तुला कधी कळले
         नाहीत◆●●

___________________________

माझ्या हृदयाच्या भावना तुला कधीच
समजल्या नाहीत तरी पण माझं तुझ्या
वरच प्रेम कधी कमी झालं नाही
घाव अंतरीचे तुला कधी कळले नाही
माझं खूप प्रेम आहे तुझ्या वर यांची
जाणीव तुला कधीच झाली नाही
माझी अडचण माझ्या परिस्थिती ला
तू कधीच समजू शकली नाही
तुला भेटायची खूप इच्छा असताना
देखील मी तुला कधी कधी भेटू
शकलो नाही यात माझी मजबुरी होती
हे तुला कधी मी सांगू शकलो नाही
आणि हे सांगणे प्रेमात महत्वाचं नसत
माझ्या प्रत्येक सुखात तुझं सुख आहे
हे प्रेमात मला केव्हाच महत्वाचं वाटलं
नाही
प्रेमात हे सांगण जरुरी नसत ते तुझ्या
मनाला कधीच कळलं नाही
तरी देखील तू माझ्या वर रुसली आहेस
तुझा रुसवा पण मला काढता येणार
नाही इतकी दूर तू माझ्या पासून गेली
आहेस
माझं आज ही तुझ्या वर खूप
प्रेम आहे हे तुला ज्या वेळी समजेल
त्या वेळी मी या जगात नसेल..........
..✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर
___________________________