गुरूच्या कविता...!

Started by Balaji lakhane, January 02, 2017, 08:40:47 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

💞💞💞💞💞💞💞💞💞💞

-----------असच दे साथ मला-----------

तू मनातल तुझ्या..
माझ्या समोर मांडत नाहीस...
पण मला माहिती तू माझ्यावर
खूप प्रेम करतेस...
सर्व समजत गं मला..
प्रिये तू अबोल राहून,
सुध्दा बोलतेस....
ओठाने नाही पण ह्रदयातून,
तुझ्या प्रत्येक धोक्यातून
मला सांगतेस...
तुझ्या हसण्यातून..
तुझ्या रूसण्यातून..
तुझ्या बोलण्यातून..
तुझ्या वागण्यातून..
मला सर्वच समजत
पण तू मात्र नकारच
देतेस अस का ? करतेस
सांग ना मनातल बोल ना,
तू मला कायम साथ देतेस,
मी कविता लिहीतो तू
त्याला सुर लावतेस...
मला चांगल्या वाईटाची
जाणीव करून देतेस....
मला जे हवयं तुझ्याकडून
मला सर्व देतेस,
पण ऒठाने काहीच,
बोलत नाहीस...
तुझा साथ माझ्या सोबत,
म्हणून कविता लिहू शकतो..
तुझा साथ नसता तर काहीच नसतो..
बर जाऊदे असच रहा.!
तुझ्या हसण्यातून मला साथ देत रहा...

---------बालाजी लखने(गुरू)--------

💞💞💞💞💞💞💞💞💞💞